Monday 30 December 2013

संभ्रम

मृगजळ असते मोहक, सुरेख,
आपल्या दृष्टीतच त्याचे अस्तित्व;
शोधू जाता ठाव ठिकाणा,
उमगते नंतर तो एक संभ्रम ||

आनंद असतो जगण्यात, म्हणतात खरे,
का आपल्या मानण्यात, नकळे;
अनुभवता हे जीवन, बोल येती ओठी,
हा आनंदही एक संभ्रम ||

वादळापूर्वीची शांतता, असते गूढ मूकी,
भयाण असते ती? का बापडी?
क्लिष्ट जिचा अंदाज बांधणे,
ती शांतता ही एक संभ्रम ||

मृगजळापरी हे जगणे, असते मोहक बाह्यस्वरूपे,
भयाणता त्याची, अनुभवल्याविणा न उमगे;
तरीही आपण जगतोच ना, आनंद उपभोगतोच ना,
कारण हे आयुष्यच एक संभ्रम ||

-ॐकार

Link to my English writings. Click here.

No comments:

Post a Comment