Tuesday 1 October 2013

ही माणसे

जगाच्या ह्या पटावरती आहेत अनेक चेहरे।
प्रत्येकाची चाल वेगळी जणू बुध्दीबळातील मोहरे।।

काही असती धूर्त, लबाड; काही सरळ भाबडे।
सूज्ञ असती त्यातील काही, काही निव्वळ वेडे।।

वाद घालती इतरांशी नसता कारण काही।
माणूस आहोत आपण ह्याची जणू त्यांना जाणच नाही।।

मिरवती बिरुदे बौध्दिमत्तेची गर्वाने ह्या भूलोकावरी।
ठेच लागूनही चुकल्यावर कळते ह्यांची हुशारी।।

जेष्ठ वागती कनिष्ठांसारखे करती पोरकटपणा।
हक्काने सांगती कनिष्ठांना माञ, आमच्यासारखे बना

कुरघोडी करती एकमेकांवर, काही खेळती जिवाशी।
विसरून जाती साफ माञ आपण एकाच नावेतील प्रवासी।।

मृगजळापरी ही माणसे कधी कोणा ना उमगणार।
कलियुगातील मानवाचे गूढ ब्रम्हासही ना उकलणार।।

-ॐकार

Link to my English writings. Click here.

No comments:

Post a Comment